Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
If you are looking for Famous Marathi Mhani List then you have come to the right blog because we will share with you the best mhani in Marathi and I hope you will love these Marathi mhani.
99+ Best Famous Marathi Mhani List | Marathi Mhani | मराठी म्हणी 2022
अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
अंगात नाही बळ आणि चिमटा
घेऊन पळ.
अक्कल नाही काडीची म्हणे
बाबा माझे लग्नं करा.
अक्कल नाही काडीची नाव
सहस्त्रबुद्धे.
अग अग म्हशी, मला कुठे गं
नेशी.
अती केला अनं मसनात गेला.
अडला हरी गाढवाचे पाय धरी.
अती परीचयात आवज्ञा.
अती तिथं माती.
अती राग भिक माग.
अत्युची पदि थोरही बिघडतो, हा
बोल आहे खरा.
अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
अळी मिळी गुपचिळी.
अनुभवल्याशिवाय कळत नाही
चावल्याशिवाय गिळत नाही.
असंगाशी संग आणि
प्राणाशी गाठ.
असेल तेव्हा दिवाळी नसेल
तेव्हा शिमगा.
असतील शिते तर जमतील
भूते.
असेल हरी तर देईल
खाटल्यावरी.
असेल दाम तर होईल
काम.
आंधळा मागतो एक डोळा देव
देतो दोन डोळे.
आधी करावे मग सांगावे.
आई भाकर देत नाही अऩ
बाप भिक मागू देत नाही.
आधी नमस्कार मग
चमत्कार.
आधी जाते अक्कल मग
सुचते शहाणपण.
आधी पोटोबा, मग
विठोबा.
आधी होता वाघ्या, मग झाला
पाग्या, त्याचा स्वभाव जाईना,
त्याचा येळकोट राहीना.
आधी लगीन कोंढाण्याचे
मग माझ्या रायबाचे.
आपण आपल्याच
सावलीला भितो.
आधीच दुष्काळ त्यातून
ठणठण गोपाळ.
आपण आरे म्हटले की
कारे आलेच.
आपला हात,
आपला हात, जग्गन्नाथ.
आपण सुखी तर जग सुखी.
आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.
आपली ठेवायची झाकून अऩ
दुसऱ्याची पहायची वाकून.
आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते
लफडे.
आपल्या ताटातले गाढव दिसत
नाही पण दुसऱ्याच्या ताटातली
माशी दिसते.
आपलेच दांत अऩ
आपलेच ओठ.
आयत्या बिळात नागोबा.
आभाळ फाटल्यावर ढिगळ
कुठे कुठे लावणार?
आवडतीचा शेंबुड गोड आणि
नावडतीचे मीठ आळणी.
आशा सुटेना अन देव
भेटेना.
आवळा देवून भोपळा काढणे.
(आवळा देवून कोहळा काढणे.)
ऊस गोड लागला म्हणून
मुळासगट खावू नये.
उघड्याकडे नागडा गेला अनं
रात्रभर हिवाने मेला.
एका कानाने ऐकावे, दुसऱ्या
कानाने सोडून द्यावे.
कावळ्याने कितीही अंग
घासले तरी बगळा होत नाही.
एकाने गाय मारली म्हणून
दुसऱ्याने वासरु मारु नये.
गाजराची पुंगी वाजली तर
वाजली नाहीतर मोडून
खाल्ली.
खाईन तर तुपाशी नाहीतर
उपाशी.
चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि
पराक्रमाशिवाय पोवाडा नाही.
ज्या गावाला जायचे नाही त्य
गावचा रस्ता विचारू नये.
चिता मेलेल्या माणसाला जाळते,
पण चिंता जिवंत माणसाला जाळते.
ज्याचं करावं भलं तोच
म्हणतो आपलचं खर.
खिशात नाही डोनेशन…घ्यायला
चालला एडमीशन..
दांत आहे तर चणे नाहीत,
चणे आहेत तर दांत नाहीत.
तूप खाऊन रुप येत नाही आणि
नाक पूसून सर्दी जात नाही.
काटकसर मध्ये कमवल,
इन्कमटॅक्स मध्ये गमवला…
ओळख ना पाळख अन् मला
म्हणा लोकमान्य टिळक.